राज्यात कोरोना मुळे पहिला बळी

Foto
मुंबई : करोनामुळे महाराष्ट्रातला पहिला मृत्यू झाला आहे. मुंबईत कस्तुरबा रूग्णालयात 65 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  दुबईवरून प्रवास करून ते भारतात परतले होते.

    दुबईहून आलेल्या या व्यक्तिला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्वरित कस्तुरबा दाखल करण्यात आले होते. मात्र आता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने भारतातही वेगाने प्रवेश केला. भारताची आर्थिक राजधानीतही कोरोनाने शिरकाव केला आहे. आता कोरोनामुळे मुंबईत पहिला मृत्यू झाला आहे. मुंबईतील 64 वर्षीय रुग्णाचा कस्तुरबा गांधी रुग्णालयात मृत्यू झाला. दुबईहून आलेल्या या व्यक्तिला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्वरित कस्तुरबा दाखल करण्यात आले होते. मात्र आता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.